60 -70 च्या दशकात हिंदी चित्रपट सृष्टीला आपल्या गायकीची दखल घ्यायला लावत चित्रपट संगीतात अग्रस्थानी राहिलेल्या प्रसिद्ध पार्श्वगायिका शारदा राजन अय्यंगार यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले .
‘सुरज’ या 1966 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात शारदा यांनी गायलेले ‘तितली उडी’ हे पहिलेच गाणे लोकप्रिय झाले होते.
हिंदी बरोबरच मराठी ,गुजराती, पंजाबी ,तमिळ, तेलुगु अशा विविध भाषांमध्ये त्यांनी गाणे गायले आहेत.
त्यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1937 रोजी झाला.
1970 मध्ये आलेल्या ‘जहा प्यार मिले’ या चित्रपटातील ‘बात जरा है आपकी’ या कॅब्रे शैलीतील गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.