Current Affairs
प्रा. डॉ ज.रा. दाभोळे यांचे निधन |
- 04/11/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
तत्त्वज्ञानाचे गाढे व्यासंगी, महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर ज.रा. दाभोळे यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले.
दाभोळे यांना महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच कर्मवीर भाऊराव पाटील , बॅरिस्टर पी.जी. पाटील ,डॉक्टर जे. पी. नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांनी कराडच्या सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान विषयाच्या अध्यापनाला सुरुवात केली. तर राजर्षी शाहू महाविद्यालयात तत्त्वज्ञान विभाग प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले.
त्यांचे वडील सत्यशोधक समाजाचे पुरस्कर्ते होते.
माध्यमिक शिक्षणाच्या वेळी त्यांनी संस्कृत भाषेचे शिक्षण घेतले होते.
तत्त्वज्ञान विषयात पुढे अभ्यास करताना त्यांना तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, श्रीनिवास दीक्षित इत्यादी दिग्गजांचे मार्गदर्शक मिळाले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बौद्ध तत्त्वज्ञानाचे केलेले विश्लेषण या विषयावरील संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल केली.