Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > बँक ऑफ इंडिया च्या प्रमुखपदी रजनीश कर्नाटक यांची नियुक्ती
बँक ऑफ इंडिया च्या प्रमुखपदी रजनीश कर्नाटक यांची नियुक्ती
- 02/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रजनीश कर्नाटक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे बँकिंग क्षेत्रातील 29 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे.
रजनीश कर्नाटक यांनी भूषवलेली महत्वाची पदे:
2021 मध्ये युनियन बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक पद स्वीकारण्यापूर्वी रजनीश कर्नाटक हे पंजाब नॅशनल बँकेत प्रमुख व्यवस्थापक पदावर कार्यरत होते
रजनीश कर्नाटक हे वाणिज्य शाखेचे पदव्युत्तर पदवीधारक असून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्सचे सर्टिफाईड असोसिएट आहेत
ते एफएसआयबीने आयआयएम बंगळुरू इगॉन झेंडरसाठी निवडलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचाही भाग होते
बँक ऑफ इंडिया:
बँक ऑफ इंडिया ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे
स्थापना : 7 सप्टेंबर 1906
राष्ट्रीयकरण : 1969
मुख्यालय : मुंबई