Current Affairs
बांगलादेशातील ‘मैत्री’ औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्याला सुरवात
- 27/07/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
भारत हेवी इलेक्ट्रिकल या सरकारी कंपनीच्या बांगलादेशातील मैत्री औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यातून नियमित वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
दुसऱ्या टप्प्याची वीज निर्मिती क्षमता 660 मेगावॉट असून एकूण प्रकल्पाची क्षमता 1,320 मेगावॉट आहे.
दुसऱ्या टप्प्यातील निर्मिती प्रकल्प मुख्य ग्रीड ला जोडण्यात आला असून निर्धारित मानांकनानुसार हा पुरवठा सुरू झाला आहे.
याला प्रकल्पाचे ‘सिंक्रोनायजेशन’ असे म्हटले जाते.
बांगलादेशातील रामपाल, मंगला आणि बागेरघाट येथे हा प्रकल्प आहे दोन्ही देशांच्या सरकारमधील करारानुसार त्याची उभारणी करण्यात आली आहे.
‘ मैत्री’ प्रकल्पाविषयी:-
‘ मैत्री’ हा भारत आणि बांगलादेश यांच्या संयुक्त भागीदारीत उभारलेला औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहे .
प्रकल्पाची एकूण क्षमता 1,320 mw.
दुसऱ्या टप्प्याची क्षमता 660 mw .
या प्रकल्पासाठी ‘भेल’ने बांगलादेश- इंडिया फ्रेंडशिप पावर कंपनी ही संयुक्त कंपनी स्थापन केली.
या कंपनीत बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्ड आणि भारताचे राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा मंडळ यांचा प्रत्येकी 50 टक्के हिस्सा.