Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > बायडेन यांच्या धोरण सल्लागारपदी नीरा टंडन यांची नियुक्ती
बायडेन यांच्या धोरण सल्लागारपदी नीरा टंडन यांची नियुक्ती
- 07/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या चमूत भारतीय वंशाच्या आणखी एका महिलेला स्थान मिळाले आहे.
● बायडेन यांच्या देशांतर्गत धोरण सल्लागारपदी भारतीय – अमेरिकी नीरा टंडन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
● विद्यमान सल्लागार सुसान राईस यांची जागा टंडन घेणार आहेत
● व्हाईट हाऊसच्या सल्लागार परिषदेचे नेतृत्व करणाऱ्या टंडन ह्या पहिल्या आशियाई- अमेरिकी ठरल्या आहेत.
● व्हाईट हाऊस मधील कर्मचारी सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे .
● अध्यक्ष बायडेन यांच्या त्या वरिष्ठ सल्लागारही होत्या.
● अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याबरोबरही निरा टंडन यांनी काम केले आहे.
नीरा टंडन :
● जन्म : 10 सप्टेंबर 1970
● नीरा टंडन यांचा जन्म मॅसाच्युसेट्समध्ये झाला होता.
● त्यांनी कॅलिफोर्निया आणि येल विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले.
● टंडन यांना सार्वजनिक धोरण क्षेत्रात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.
● त्यांनी आतापर्यंत अमेरिकेतील तीन राष्ट्रपतीबरोबर काम केलं आहे. तसेच डाव्या विचारसरणीची थिंकटँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेंटर फऑर अमेरिकन प्रोग्रेसच्या (सीएपी) अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी पदाची जबाबदारीदेखील त्यांनी सांभाळली आहे.
● त्यांना हिलेरी क्लिंटन यांची विश्वासू सहकाही म्हणून ओळखलं जातं.