Current Affairs
बीबीसी चे अध्यक्ष शार्प यांचा राजीनामा
- 29/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे (बीबीसी) अध्यक्ष रिचर्ड शार्प यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात ते आपल्या सहभागाबद्दलचा समाधानकारक खुलासा देऊ न शकल्याचा अहवाल सादर झाला त्यानंतर शार्प यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले .
बॅरिस्ट ॲडम हॅप्पी हेप्पीन्स्टॉल यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणी चौकशी करण्यात आली
बीबीसी:
ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) ही जगातील सर्वात मोठी प्रसारण संस्था आहे. केवळ इंग्लंड मध्ये या संस्थेचे सुमारे २८,५०० कर्मचारी आहेत व वार्षिक आर्थिक उलाढाल सुमारे ८०० कोटी डॉलर इतकी आहे.
बीबीसी ही पहिली राष्ट्रीय प्रसारण संस्था आहे. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी लिमिटेड या नावाने 18 ऑक्टोबर 1922 मध्ये स्थापित झाल्यानंतर १९२७ मध्ये ही संस्था सार्वजनिक बनली.
ही संस्था अनेक मनोरंजन आणि माहितीपर कार्यक्रम निर्मित करते, जे सर्व जगभरात दूरचित्रवाणी (टेलिव्हिजन), आकाशवाणी आणि इंटरनेटच्या माध्यमातून प्रसारित केले जातात.
ब्रीदवाक्य : “Nation Shall Speak Peace Unto Nation”
संस्थापक : जॉन रेथ
मुख्यालय : लंडन