पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जुलै रोजी फ्रान्सची राजधानी पॅरिस मध्ये होणाऱ्या ‘बॅस्टील डे’ संचलनासाठी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार या संचलनात भारतीय सशस्त्र दलातील एक पथकही सहभाग होणार आहे.
हा फ्रान्सचा राष्ट्रीय दिन असून त्याला ‘बॅस्टील डे’ असेही म्हणतात. तो दरवर्षी 14 जुलै रोजी साजरा केला जातो.
भारत – फ्रान्स व्यूहात्मक परस्परसंबंधांच्या रौप्यमहोत्सवानिमित्त फ्रान्सचे अध्यक्ष इम्यान्यूएल मॅक्रोन यांनी ‘बॅस्टील डे’ संचलनसमयी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे मोदींना निमंत्रण दिले होते.