Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > भारतीय तटरक्षक दल, गोवा यांच्याकडून उडेर धबधब्यावर स्वच्छता मोहीम | Clean-up drive at Uder Falls by Indian Coast Guard, Goa
भारतीय तटरक्षक दल, गोवा यांच्याकडून उडेर धबधब्यावर स्वच्छता मोहीम | Clean-up drive at Uder Falls by Indian Coast Guard, Goa
- 07/08/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
● भारत सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या उपक्रमाच्या अनुषंगाने आणि ‘स्वच्छ सागर अभियाना’शी स्वत:ला जोडून भारतीय तटरक्षक दल समुद्रकिनाऱ्यांवरील कचरा स्वच्छ करुन, समुद्रकिनारे स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्याच्या प्रयत्नात सातत्याने अग्रणी भूमिका निभावत आहे.
● वेर्णा येथील उडेर धबधब्याच्या स्वच्छतेसाठी भारतीय तटरक्षक दलाने नुकतेच स्वच्छता अभियान हाती घेतले होते.
● स्वच्छता मोहिमेत 30 जुलै 2023 रोजी तटरक्षक वैमानिकी तपासणी सेवा विभागासह 40 कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला.
● तटरक्षक दलाच्या जवानांनी धबधब्याला भेट दिली असता त्यांनी प्लास्टिक आणि काचेने भरलेला परिसर पाहिला.
● या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि ‘आम्ही संरक्षण आणि संवर्धन करतो’ या घोषवाक्याखाली ‘स्वच्छ आणि हरित भारता’च्या संकल्पनेला चालना देण्यासाठी सीजीएआयएस गोवा चमूने स्थानिक आणि पर्यटकांसह स्वच्छता मोहीम हाती घेतली.
● स्वच्छतेसाठी जनजागृती करण्यासाठी वेर्णा पंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
● स्वच्छता मोहिमेतून 250 किलो प्लास्टिक आणि काचेचा कचरा गोळा करण्यात आला असून, पर्यावरणाच्या जबाबदारीचा संदेश देत तटरक्षक दलाने सर्व स्थानिकांना आणि पर्यटकांना गोव्याच्या प्राचीन सौंदर्याचे आणि भावी पिढ्यांसाठी पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.