भारताच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इस्राईल मधील इलायत शहरातील एका चौकाला ‘इंडियन- ज्यूईस कल्चर स्क्वेअर’ असे नाव देण्यात आले आहे.
भारत आणि इस्राईल मधील दृढ संबंध आणि समान मूल्यांच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आल्याचे इलायतचे महापौर एली लॅकरी यांनी सांगितले.
हा चौक म्हणजे दोन देशांमधील प्रेम ,मैत्री परस्पर सहकार्य यांचे प्रतीक आहे.