Current Affairs
भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश
- 20/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
-
- संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार आता भारताने लोकसंख्येमध्ये चीनला मागे टाकले आहे
-
- भारताची लोकसंख्या 142.86 कोटी झाली असून चीनची लोकसंख्या 142.57 कोटी आहे
-
- युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (युएनएफए) या संस्थेने ‘स्टेट ऑफ वर्ल्ड पोपुलेशन रिपोर्ट -2023’ हा अहवाल प्रसिद्ध केला असून त्यामध्ये भारताची लोकसंख्या चीन पेक्षाही अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे
भारतातील स्थिती:
-
- भारतामध्ये 15 ते 64 या कमावित्या वर्षांमधील नागरिकांचे प्रमाण लोकसंख्येच्या 68% आहे
-
- 0 ते 14 या वयोगटात 25%, 10 ते 19 वयोगटात 18%, 10 ते 24 वयोगटात 26% नागरिक आहेत
-
- 65 वर्षे वरील निवृत्तीच्या वयातील नागरिकांचे प्रमाण 7 % आहे
-
- देशात केरळ आणि पंजाब या राज्यांमध्ये वृद्धांची संख्या सर्वाधिक असून बिहार आणि उत्तर प्रदेश ही राज्यात तुलनेने तरुण असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे
-
- 1950 पासून जागतिक लोकसंख्येची आकडेवारी संयुक्त राष्ट्रामार्फत जाहीर होऊ लागली त्यानंतर प्रथमच या यादीत भारत अव्वल स्थानी पोहोचला आहे
सर्वाधिक लोकसंख्या असलेली अव्वल दहा देश:
1)भारत – 142.86 कोटी
2) चीन – 142.57 कोटी
3)अमेरिका – 34 कोटी
4)इंडोनेशिया – 27.75 कोटी
5) पाकिस्तान- 25.5 कोटी
6)ब्राझील – 21.62 कोटी
7) नायजेरिया – 22.38 कोटी
8) बांगलादेश – 17.30 कोटी
9) रशिया – 14.44 कोटी
10)मेक्सिको – 12.85 कोटी