Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > मध्यप्रदेशात 5 व्या हेलिकॉप्टर आणि स्मॉल एअरक्राफ्ट शिखर परिषदेचे आयोजन
मध्यप्रदेशात 5 व्या हेलिकॉप्टर आणि स्मॉल एअरक्राफ्ट शिखर परिषदेचे आयोजन
- 24/07/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
- मध्य प्रदेश सरकार, नागरी विमानवाहतूक मंत्रालय, पवन हंस लिमिटेड आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) यांनी संयुक्तपणे 5 व्या हेलिकॉप्टर आणि स्मॉल एअरक्राफ्ट शिखर परिषदेचे आयोजन मध्य प्रदेशात खजुराहो येथे 25 जुलै 2023 रोजी केले आहे.
- शिखर परिषदेचे उद्घाटन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक व पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते होणार आहे
- उडान योजनेची व्याप्ती वाढवून दुर्गम आणि डोंगराळ प्रदेशात या सेवेचा विस्तार करणे हे शिखर परिषदेच्या उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट आहे.
परिषदेची संकल्पना:
- “रिचिंग द लास्ट माईल: हेलिकॉप्टर आणि स्मॉल एअरक्राफ्टद्वारे स्थानिक संपर्क”
शिखर परिषदेची मुख्य उद्दिष्टे:
- विमानउ द्योगातील संबधितांना आणि धोरणकर्त्यांना भारतीय हेलिकॉप्टर आणि स्मॉल एअरक्राफ्ट उद्योगाच्या विस्ताराबद्दल चर्चा करण्यासाठी एक समान मंच उपलब्ध करुन देणे.
- दुर्गम आणि डोंगराळ भागात उडान योजनेचा विस्तार करणे आणि देशाच्या ग्रामीण ते शहरी कनेक्टिव्हिटीत वाढ करणे.
- विद्यमान आणि संभाव्य प्रमुख पर्यटनस्थळी हेलिकॉप्टर आणि लहान विमानांमार्फत कनेक्टिव्हिटी वाढवून विनाव्यत्यय हवाई सेवा देणे .