केंद्र सरकारची पंतप्रधान विश्वकर्मा सन्मान योजना राज्यात राबविण्यात येणार आहे.
उद्देश:-
ग्रामीण व शहरी भागातील पारंपारिक कारागीर व लहान व्यवसायिकांना सवलतीच्या व्याजदराने व तारण मुक्त कर्ज उपलब्ध करून देणारी ही योजना आहे.
या योजनेच्या माध्यमातून पारंपारिक कारागीर म्हणजे बारा बलुतेदारांची प्रथमच नोंदणी केली जाणार आहे.
देशभरात या योजनेची पुढील आठवड्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने या योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत राज्यांना मार्गदर्शन सूचना दिले आहेत.
Δ