Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
- 13/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
● महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार देतानाच त्याबाबत विधानसभा अध्यक्षांनीच निर्णय घ्यावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.
● सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. हिमा कोहली ,न्या. एम. आर. शहा, न्या. पी. एस .नरसिंहा ,न्या. कृष्ण मुरारी या पाच सदस्यांनी निकाल दिला.
न्यायालयाच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे:
● 10 व्या अधिसूची अंतर्गत लोकप्रतिनिधींच्या अपात्रतेवर न्यायालय निर्णय देत नाही. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा.
● संबंधित आमदारांना विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होण्याचा अधिकार असून ते आमदार अपात्र ठरले तरी कामकाज अवैध ठरणार नाही.
● 10 वी अधिसूची व निवडणूक चिन्ह संदर्भात पंधराव्या परिच्छेदअनुसार विधानसभा अध्यक्ष व केंद्रीय निवडणूक आयोगाला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार आहे .
● ठाकरे यांनी बहुमताची चाचणी न घेता राजीनामा दिल्याने पूर्वपरिस्थिती कायम करता येणार नाही.
● एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्याचा राज्यपालांचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या वैध आहे.
● पक्षप्रतोद नियुक्त करण्याचा अधिकार विधिमंडळ पक्षाला नव्हे तर पक्ष संघटनेला आहे.
● राजकीय पक्षाने अधिकृत नेमलेल्या पक्षप्रतोद व विधानसभेचा गटनेत्याला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली पाहिजे. विधानसभा अध्यक्षांनी भारत गोगावले यांना पक्षप्रतोद म्हणून दिलेली मंजुरी बेकायदा आहे .
● निवडणूक चिन्ह संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रकरणाशी निगडित तथ्य व परिस्थिती यांचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा.
● पक्षात दोन व अधिक गट पडले असतील तर मूळ राजकीय पक्ष कोणता याचा निर्णय प्रथमदर्शनी विधानसभा अध्यक्ष घेतील
● उद्धव ठाकरे यांना बहुमताची चाचणी घेण्यासंदर्भातील राज्यपालांनी दिलेला आदेश योग्य नव्हता. सरकारकडे बहुमत नाही हा निष्कर्ष काढण्यासाठी राज्यपालांकडे सबळ पुरावे नव्हते.