Current Affairs
मानवाधिकारांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या लघुपट स्पर्धेत ‘चिरभोग’ला अव्वल क्रमांक
- 04/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
मानवाधिकार्यांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या लघुपट स्पर्धेत राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने मराठी लघुपट ‘चिरभोग’ ची प्रथम पारितोषकासाठी निवड केली आहे .
असामी भाषेतील ‘सक्षम’ ला द्वितीय तर तमिळ भाषेतील ‘अचम थाविर’ ला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
लघुपट चित्रपटांच्या माध्यमातून मानवी हक्क संवर्धनाच्या सर्जनशील प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी मानव अधिकार आयोगातर्फे मानवाधिकार आयोग लघुपट पुरस्कार स्पर्धा घेतली जाते.
प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेचे यावर्षीचे आठवे वर्ष होते.
एकूण 123 लघुपट स्पर्धेत होते.
प्रथम क्रमांकासाठी दोन लाख रुपयांचा पुरस्कार आहे.
समाजातील जात आणि व्यवसाय यावर आधारित भेदाभेद तसेच स्वतंत्र्य , समानता, सन्मान आणि मानवी हक्क यासाठी संघर्षावर निलेश आंबेडकर यांनी ‘चिरभोग’ मध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे.
भवानी डोले टाहु यांनी ‘सक्षम’ मध्ये दिव्यांग मुलाची कथा सादर केली आहे.
दिव्यांग व्यक्तीबद्दलची मानसिकता बदलण्याची गरज आहे. संगोपणात भेदभाव न करण्याचा संदेश पालकांना देण्यात आला आहे.
याल लघुपटाला दीड लाख रुपयांच्या पारितोषिकाची घोषणा करण्यात आली.
तृतीय क्रमांकाचे पारितोषकाची रक्कम एक लाख रुपये इतकी आहे. टी. कुमार यांच्या ‘अचम थावीर’ मध्ये अनुचित स्पर्श आणि लैंगिक छळाबद्दल विद्यार्थिनींमध्ये तसेच शालेय प्रशासनामध्ये जागरूकता वाढविण्यासाठी संदेश या लघुपटाद्वारे देण्यात आला आहे.
मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने पुरस्कार विजेत्या लघुपटांची निवड केली.
आयोगामध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे आणि राजीव जैन या सदस्यांचा समावेश होता