Current Affairs
मायकेल डग्लस यांना सत्यजित राय पुरस्कार | Satyajit Rai Award to Michael Douglas
- 14/10/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
प्रसिद्ध हॉलीवुड स्टार मायकेल डग्लस यांना चित्रपटसृष्टीतील असामान्य योगदानासाठी सत्यजित राय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार गोव्यातील 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली.
हा चित्रपट महोत्सव 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे.
आपल्या पाच दशकांच्या कारकीर्दीत 79 वर्षीय डग्लस यांनी ‘वॉल स्ट्रीट’, ‘ फॅटल अट्रॅक्शन’, ‘द वॉर ऑफ द रोझेस’, ‘बेसिक इन्स्टिक्ट’, ‘ फॉलींग डाऊन’,’ दी अमेरिकन प्रेसिडेंट’,’ ट्रॅफिक’ आणि ‘वंडर बॉईज’ इ. लोकप्रिय चित्रपटामध्ये काम केले आहे.
मायकेल यांनी 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वन फ्लू ओव्हर द कक्कुज नेस्ट’ साठी पहिल्यांदा ऑस्कर पुरस्कार जिंकला होता.
त्यानंतर ‘वॉल स्ट्रीट’ साठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.