फिनलँडचे माजी पंतप्रधान आणि जागतिक शांततेसाठी 2008 या वर्षी नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरलेले मार्टि अहतासारी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले.
अहतासारी हे मागील दोन वर्षापासून स्मृतीभ्रंश या आजाराशी झुंज देत होते.
सर्बिया आणि कोसोवो यांच्यातील संघर्ष थांबविण्यात आणि नामीबियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासह अनेक जागतिक संघर्ष थांबविण्यात अहतासारी यांनी मोलाचे योगदान दिले आहे.