जपानच्या मुख्य बेटांवर 2 जून रोजी उष्णकटिबंधीय वादळ मावर धडकले.
या वादळामुळे पडलेल्या मुसळधार पावसाने रेल्वेसह वाहतूक ठप्प झाली. जपानच्या दक्षिण आणि पश्चिम प्रांतांत पुराचा आणि दलदलीचा धोका निर्माण झाला आहे.
जपानच्या पश्चिमेकडील वाकायामा, कोची आणि मध्य जपान मधील नागानो यासह पुराचा धोका असलेल्या सखल भागातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
मवार हे गेल्या वीस वर्षांत गुआम येथे आलेले सर्वात शक्तिशाली वादळ आहे.