Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > मुंबईतील आयएनएस तुनीर वर पहिला एमसीए बार्ज, एलएसएएम 7 (यार्ड 75) तैनात
मुंबईतील आयएनएस तुनीर वर पहिला एमसीए बार्ज, एलएसएएम 7 (यार्ड 75) तैनात
- 19/07/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
- भारत सरकारच्या “आत्मनिर्भर भारत” उपक्रमांच्या अनुषंगाने विशाखापट्टणम येथील एमएसएमई मेसर्स सेकॉन इंजिनीअरिंग प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत 08 x क्षेपणास्त्र आणि दारुगोळा (एमसीए) बार्जच्या बांधकामाचा करार झाला होता.
- एलएसएएम 7 (यार्ड 75) या मालिकेतील पहिला बार्ज 18 जुलै 23 रोजी आयएनएस तुनीरचे कमांडिंग ऑफिसर कमोडोर इफ्तेखार आलम यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आला.
- भारतीय शिपिंग रजिस्टर (IRS) च्या वर्गीकरण नियमांनुसार 30 वर्षांच्या सेवा काळ देणाऱ्या बार्जची निर्मिती करण्यात आली आहे.
- स्वदेशी उत्पादकांकडून मिळणाऱ्या सर्व प्रमुख/सहायक उपकरणांसह, बार्ज हे संरक्षण मंत्रालयाच्या “मेक इन इंडिया” उपक्रमाचा अभिमानास्पद ध्वजवाहक आहे.
- एमसीए बार्जेसच्या समावेशामुळे जेटींच्या बाजूने आणि बाह्य बंदरांवर भारतीय नौदलाच्या जहाजांची वाहतूक, आणि वस्तू / दारुगोळा उतरवणे सुलभ होऊन भारतीय नौदलाच्या मोहिमा कार्यान्वित करायच्या वचनबद्धतेला चालना मिळेल