Current Affairs
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी रमेश धनुका
- 27/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
मुंबई उच्च न्यायालयाला अखेर दि. 26 मे 2023 रोजी नवे मुख्य न्यायमूर्ती मिळाले.
देशाच्या राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती रमेश देवकीनंदन धनुका यांची 46 वे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. मात्र ते केवळ चारच दिवस उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील.
मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश पदावर विराजमान झालेल्या न्यायमूर्तींचा हा आतापर्यंतचा सर्वात कमी कार्यकाळ असणार आहे. रविवार 28 मे रोजी राजभवनात त्यांचा शपथविधी होणार आहे.
न्यायमूर्ती रमेश डी. धनुका यांची 23 जानेवारी 2012 रोजी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ते 30 मे 2023 रोजी निवृत्त होणार आहेत.
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे निवृत्तीचे वय 62 आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने 19 एप्रिल रोजी न्यायमूर्ती धानुका यांना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बढती देण्याची शिफारस केली होती.
मागील वर्षी 11 डिसेंबर रोजी माजी मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाल्यापासून पाच महिन्यांहून अधिक काळ उच्च न्यायालय कायमस्वरूपी मुख्य न्यायमूर्तीविना होते.
त्यानंतर ज्येष्ठ न्यायमूर्ती एस व्ही गंगापूरवाला यांची कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 26 मे रोजी मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्तीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली.
मुंबई उच्च न्यायालय:
स्थापना : 14 ऑगस्ट 1862
अधिकारक्षेत्र : महाराष्ट्र, गोवा , दादरा-नगर हवेली आणि दमन व दिव