Current Affairs
मेघालयात बेडकाच्या नवीन प्रजातीचा शोध
- 13/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information

मेघालयातील दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यात खोल गुहेत बेडकाची नवीन प्रजाती शोधण्यात भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षणाच्या संशोधकांना यश आले आहे. हे संशोधन इराणमधील लोरेस्तान विद्यापीठाकडून प्रकाशित होणाऱ्या ‘ऍनिमल डायव्हर्सिटी’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
भारतात गुहेत बेडकाची प्रजाती शोधण्याची ही दुसरीच वेळ आहे. यापूर्वी 2014 मध्ये तमिळनाडूत बेडकाची ‘मायक्रोक्सलस स्पेलुंका’ ही प्रजाती शोधण्यात यश आले होते.
अमोलोप्स सिजू असे नामकरण
मेघालय मधील दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यातील सिजू गुंफा प्रणालीमध्ये ‘कॅस्केड रॅनीड’ बेडकाची नवीन प्रजाती शोधली.
संशोधकांच्या पथकात मेघालयातील साईकिया आणि डॉ. विक्रमजीत सिन्हा तर पुण्यातील डॉ. के. पी. दिनेश आणि अन्सारींचा समावेश होता.
सिजू गुहा ही चार किलोमीटर लांबीची नैसर्गिक चुनखडीची गुहा आहे आणि कोरोना लॉकडाऊन पूर्वी जानेवारी 2020 मध्ये सुमारे 60 ते 100 मीटर खोलवर हा बेडूक सापडला.
या नवीन बेडकाला तो सापडलेल्या गुहेवरून ‘अमोलोप्स सिजू’ हे नाव देण्यात आले.