Current Affairs
मेट्रोची हुगळी नदीखालून ऐतिहासिक धाव
- 14/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
देशातील मेट्रोचे जाळे विस्तारत असताना कोलकत्ता मेट्रोने इतिहास घडविला. देशात नदीखालच्या बोगद्यातून ऐतिहासिक प्रवास करणारी पहिली मेट्रो होण्याचा मान कोलकत्ता मेट्रोने मिळविला.
कोलकत्यातील हुगळी ते हावडा पर्यंत मेट्रोची चाचणी घेण्यात आली. मेट्रोच्या डब्यात केवळ अधिकारी व अभियंते होते. मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक पी. उदयकुमार रेड्डी हे या ऐतिहासिक प्रवासाचे साक्षीदार ठरले. त्यांनी मेट्रोच्या डब्यातून कोलकत्यातील महाकारण स्थानकाहुन ते हावडा मैदान स्थानकापर्यंत प्रवास केला.
असा झाला प्रवास
कोलकत्यातील हुगळीहुन हावडापर्यंत मेट्रोचा नदीखालील बोगद्यातून प्रवास
या डब्यात केवळ मेट्रोचे अधिकारी अभियंतांचा समावेश
हा बोगदा पाण्याच्या पृष्ठभागापासून 32 मीटर खोलीवर
बोगद्यात पाण्याचा प्रवाह न येण्यासाठी अनेक उपाययोजना
मेट्रो हुगळी नदीखालून 45 सेकंदात 520 मीटर अंतर कापण्याची अपेक्षा
पूर्व – पश्चिम मेट्रोच्या 16.6 किलोमीटर लांबी पैकी हावडा मैदान आणि फुलबागन दरम्यान 10.8 किमीचा भूमिगत मार्ग असून हुगळी नदीच्या खालून जाणारा बोगदा आहे तर उर्वरित मार्ग उंचीवरील आहे.