Current Affairs
‘मोखा’ हे तिसरे सर्वाधिक तीव्र चक्रीवादळ
- 15/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ ‘मोखा’ आता अतितीव्र चक्रीवादळात रूपांतरित झाले आहे.
दरम्यान मान्सून पूर्व मौसमात बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांमध्ये 2016 नंतरचे हे दुसरे सर्वाधिक तीव्र चक्रीवादळ ठरले. तर मे महिन्यात निर्माण होणारे 1982 पासूनचे हे तिसरे सर्वात तीव्र चक्रीवादळ आहे.
ही बाब नुकतीच ‘जॉईंट टायफून वॉर्निंग सेंटर’ ( जेटीडब्ल्यूसी) संस्थेने दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाली.
जेजू येथील ‘जेटीडब्ल्यूसी’ या संस्थेच्या माध्यमातून उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचा अभ्यास करण्यात येतो.
हिंदी महासागर आणि प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाची माहिती संकलित करणे तसेच त्यावर आधारित इशारा देण्याचे काम ‘जेटीडब्ल्यूसी’ द्वारे केले जाते.
संस्थेद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार मान्सूनपूर्व काळात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळांची निर्मिती होते .
त्यानुसार यावर्षी ‘मोखा’ हे चक्रीवादळ निर्माण झाले असून ते बांगलादेश आणि म्यानमार किनारपट्टीजवळ जाऊन धडकले.
बांगलादेशच्या किनाऱ्यावर धडकलेले मोखा हे मागील दोन दशकातील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ आहे.
यापूर्वी 2007 या वर्षी ‘सिद्र’ हे चक्रीवादळ बांगलादेशला धडकणारे एक शक्तिशाली चक्रीवादळ ठरले होते.
नैऋत्य मोसमी पावसापूर्वी पूर्व बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळांचा एकत्रित विचार केला असता 1982 नंतर आलेले हे तिसरे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ ठरले आहे.
यापूर्वी 2019 मध्ये फणी तर 2020 मध्ये अंफन या चक्रीवादळांची बंगालच्या उपसागरात उत्पत्ती झाली होती आणि बांगलादेशच्या किनाऱ्यावर धडकले.
आधीची वादळे
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात उत्पत्ती झालेल्या चक्रीवादळांमध्ये फणी , अंफन, गोनू यांच्यानंतर आता शक्तिशाली चक्रीवादळ जमवून मोका चक्रीवादळाचा समावेश करण्यात आला आहे.
मोखा वादळ:
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झालं असून त्याला ‘मोखा’ (Cyclone Mocha) असं नाव देण्यात आल्याचं भारतीय हवामान खात्यानं जाहीर केलं आहे. अंदमान-निकोबार बेटांजवळ तयार झालेलं हे वादळ बांग्लादेश आणि म्यानमारच्या किनाऱ्यावर जाऊन धडकले
मोखा हे नाव येमेननं सुचवलं असून तिथल्या एका बंदराचं हे नाव आहे. हे बंदर काही शतकांपूर्वी कॉफीच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होतं आणि त्यावरूनच कॉफीच्या एका प्रकाराला नावंही मिळालं.