Current Affairs
रवी सिन्हा रॉ (RAW) चे नवे प्रमुख (Ravi Sinha is the new chief of RAW)
- 21/06/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
गुप्तचर क्षेत्रात दमदार कामगिरीमुळे दबदबा निर्माण केलेले जेष्ठ आयपीएस अधिकारी रवी सिन्हा यांची रिसर्च ऍनालिसिस विंग चे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
शेजारी देशांसोबतच्या घडामोडींचे सिन्हा हे तज्ञ समजले जातात.
रॉ भारताची देशाबाहेर काम करणारी गुप्तचर संस्था आहे .
‘रॉ ‘चे विद्यमान प्रमुख सामंत गोयल यांचा कार्यकाळ 30 जून रोजी पूर्ण होत असून त्यानंतर सिन्हा या पदाचे सूत्र स्वीकारतील.
भारतीय पोलीस सेवेतील छत्तीसगडच्या 1988 च्या बॅचचे अधिकारी असलेले 59 वर्षे सिन्हा यांच्या नावावर मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने शिक्कामोर्तब केले असून त्यांची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
रॉ मध्ये मागील दोन दशकावून अधिक काळ काम करत असलेले सिन्हा सध्या या संस्थेत दुसऱ्या क्रमांकाचे कमांडर आहेत
रॉ चे प्रमुख होण्याआधी ते ऑपरेशन्स विंगचे प्रमुख होते
या आधी 2019 मध्ये दोन वर्षांसाठी रॉ प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले सामंत गोयल हे 30 जून रोजी निवृत्त होत आहेत.
RAW :- Research Analysis Wing ही भारताची विदेशी गुप्तचर संस्था आहे . एजन्सीचे प्राथमिक कार्य विदेशी गुप्तचर माहिती गोळा करणे , दहशतवादविरोधी भारतीय धोरणकर्त्यांना सल्ला देणे आणि भारताच्या परकीय धोरणात्मक हितसंबंधांना पुढे नेणे हे आहे. भारताच्या आण्विक कार्यक्रमाच्या सुरक्षेतही त्याचा सहभाग आहे.
स्थापना:- 21 सप्टेंबर 1968
मुख्यालय:- नवी दिल्ली
बोधवाक्य:- धर्मो रक्षित:
प्रमुख :- सामंत गोयल
Raw चे पहिले प्रमुख :- रामेश्वरनाथ काव