Current Affairs
राजीव कुमार वार्ष्णेय यांची ब्रिटनच्या रॉयल सोसोयटीचे सदस्य म्हणून निवड
- 17/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
आनुवंशिकीशास्त्राचे संशोधक राजीव कुमार वार्ष्णेय आनुवंशिकीशास्त्रात केलेल्या संशोधनाची दखल घेत ब्रिटनच्या रॉयल सोसायटीने सदस्य म्हणून त्यांची निवड केली आहे.
सोसायटीने नुकतीच जगातील 80 नव्या सदस्यांची नावे जाहीर केली आहेत. त्यात राजीव कुमार हे एकमेव भारतीय आहेत.
ही निवड अत्यंत महत्त्वाची ठरते कारण 1960 मध्ये स्थापन झालेल्या या सोसायटीच्या आजवर बी.पॉल( 1972), एम. एस. स्वामीनाथन (1973) आणि गुरुदेव खुश (1995) या तिघांचा या समितीत समावेश होता.
राजीव कुमार यांचे कार्य
राजीव कुमार हे सध्या ऑस्ट्रेलियातील मर्दोक विद्यापीठात सेंटर फॉर क्रॉप अँड फूड इनोवेशन, वेस्टर्न ऑस्ट्रेलियन स्टेट एग्रीकल्चर बायोटेक्नॉलॉजी सेंटर आणि आंतरराष्ट्रीय कृषी आणि अन्न सुरक्षा संशोधन संस्थेचे संचालक आहेत.
सध्या डॉक्टर राजीव यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांचे पथक अनुवंशिकीशास्त्रातील संशोधनाच्या जोरावर गहू, कडधान्य आणि फळांचे नवे वाण विकसित करण्याचे काम करीत आहेत.
ही नवी वाणे जागतिक तापमानवाढ ,हवामान बदल ,अति पाऊस अति थंडी सारख्या टोकाच्या वातावरणात जास्तीत जास्त उत्पादन देण्यास समर्थ असतील.
इक्रीसॅट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी- एरिड ट्रोपिक्स या संस्थेत राजीव गेल्या 17 वर्षाहून जास्त काळ कार्यरत असून सध्या जेनेटिक गेन्स या आंतरराष्ट्रीय संशोधन विभागाचे प्रकल्प संचालक आहेत.
शेंगदाण्याच्या लागवडीसाठी नवीन पद्धत विकसित करण्यासाठी त्यांनी चीनमधील अनेक संस्थांच्या सहकार्याने या पिकाचा जनुकी आराखडा तयार करण्यात मोठे काम केले आहे.
त्यांनी जिओकार्प तेलाचे जैवविश्लेषण व शेंगदाण्याची ऍलर्जी या बाबींचा उलगडा केला आहे .
शेंगदाण्याचा जनुकीय आराखडा उलगडणे हे अति कठीण काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे
चवळी ,ज्वारी या पिकांबाबतच्या त्यांच्या जनुकीय संशोधनाला जगभरात मान्यता मिळाली आहे
इक्रीसॅट च्या ग्रेन लेज्युम्स लेझीम्स तसेच उपयोजित जनुकशास्त्र प्रकल्पात काम करीत होते
जन्म आणि शैक्षणिक पार्श्वभूमी
उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथे बहजोई येथे 13 जुलै 1973 रोजी जन्मलेले राजीव अलीगड मुस्लिम विद्यापीठातून वनस्पतीशास्त्रात बीएससी व एमएससी अशा शिक्षणानंतर मेरठ येथे चरणसिंग विद्यापीठात प्राध्यापक पी. के. गुप्ता यांच्या प्रयोगशाळेत प्राध्यापक होते
त्यानंतर त्यांनी गव्हाच्या जैवतंत्रज्ञानावर पीएचडी केली
जर्मनीतील वैज्ञानिकासह त्यांनी वनस्पतींचे जनुकशास्त्र व पीक संशोधनावर काम केले
त्यांना यापूर्वी सीएसआयआर चा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला आहे