Current Affairs
राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल | Pasha Patel as Chairman of State Agricultural Value Commission
- 19/10/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे मराठवाड्यातील नेते व कृषी क्षेत्रातील जाणकार सय्यद पाशा पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालास किफायती भाव मिळावा तसेच ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल खरेदी करता यावा यासाठी राज्य शासन राज्य शेतमाल भाव समिती अस्तित्वात होती.
2015 मध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर समितीचे राज्य कृषी मूल्य आयोगात रूपांतर करण्यात आले आहे.
कृषी क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती कृषी मूल्य तसेच शेतमाल भावाचे जाणकार असलेल्या व्यक्तीची आयोगावर मानद अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात येते .
यापूर्वी पाशा पटेल यांनी आयोगाचे अध्यक्षपद सांभाळले आहे.
त्यांनी अध्यक्षपदाच्या आपल्या कार्यकाळात खाद्यतेल व डाळींच्या बाजारभावामध्ये वाढ होण्यासाठी आयात- निर्यात धोरणात आवश्यक बदल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, तत्कालिन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या निदर्शनास आणून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता.