Current Affairs
‘राष्ट्रीय क्वांटम मिशन’ साठी 6,000 कोटी
- 20/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
देशाची आरोग्यसेवा, संरक्षण, ऊर्जा आणि माहिती – विदा सुरक्षा इत्यादी विविध क्षेत्रांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या नॅशनल क्वांटम मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली
त्यासाठी पुढील आठ वर्षांसाठी 6,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे
या निर्णयामुळे क्वांटम तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासामध्ये गुंतवणूक केलेल्या अव्वल सहा प्रमुख देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे
मिशनची अंमलबजावणी
नॅशनल क्वांटम मिशन 2023 ते 2031 या काळात राबविले जाणारा असून क्वांटम क्षेत्रात देशाच्या संशोधन आणि विकासाला मोठी चालना मिळेल.
क्वांटम तंत्रज्ञानाच्या आधारे ‘फिजिकल क्युबिट’ संगणक तयार केले जातील. हे संगणक अत्यंत सुरक्षित पद्धतीने सर्वात जटिल समस्या सोडवू शकते
भारत सातवा देश
सध्या अमेरिका ,कॅनडा, फ्रान्स, फिनलंड ,चीन आणि ऑस्ट्रिया या प्रामुख्याने सहा देशांमध्ये क्वांटम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन व विकास काम केले जात आहे
क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रासाठी वेगळे धोरण आखाणारा भारत जगात सातवा देश ठरेल
पुढील आठ वर्षांमध्ये 50 ते 1000 क्यूबिटच्या क्षमतेसह क्वांटम कम्प्युटर विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
क्वांटम संगणक:
क्वांटम संगणक हे संगणक प्रणाली मधील उपकरण असून ज्यामध्ये क्वांटम यांत्रिकी प्रणालीचा वापर केला जातो.
क्वांटम संगणकाची संकल्पना सर्वप्रथम १९८२ मध्ये नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्र रिचंड फेयनमॅन यांनी मांडली.
ट्रान्झिस्टर्सच्या आधारावर बायनरी डिजिटल इलेक्ट्रॉनिक कम्प्युटरांपासून क्वांटम संगणक वेगळे आहेत. क्वांटम संगणकाची माहितीवर प्रक्रिया आणि माहितीच्या आदानप्रदानासाठी क्वांटम गुणधर्माचा वापर करणे हे मूलतत्त्व आहे.
क्वांटम संगणक प्रक्रियेत उपअण्विक कणांच्या एकाचवेळी अनेक स्थितीत राहण्याच्या गुणधर्माचा फायदा घेतला जातो. सामान्य संगणकाची बिट रजिस्टर्स, लॉजिक गेट्स, एल्गोरिदम ही वैशिष्टये क्वांटम संगणका समान आहेत.