Current Affairs
राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पात महाराष्ट्र अव्वल
- 19/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जागतिक बँकेतर्फे हैदराबाद येथे झालेल्या आढावा मिशनमध्ये राज्याचे भूजल आयुक्त चिंतामणी जोशी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले
या प्रकल्पात देशातील राज्य व केंद्र सरकारच्या एकूण 49 अंमलबजावणी यंत्रणा आहेत.
2021 मध्ये 33व्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्राने 2022 या वर्षात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे महाराष्ट्राला यावर्षी अवलस्थान प्राप्त झाले आहे
जागतिक बँकेचे अर्थसहाय्याने महाराष्ट्रात हा प्रकल्प 2016 पासून राबविण्यात येत आहे
प्रकल्पात राबविण्यात आलेले उपक्रम:
336 निरीक्षण विहिरींवर स्वयंचलित संयंत्र बसवणे
मोबाईल व्हॅनद्वारे जलधर क्षमता चाचणीची माहिती प्राप्त करणे
राज्य भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्राची उभारणी करणे
सर्वंकष शास्त्रीय बाबींची पायाभूत माहितीच्या आधारे निर्णय आधार प्रणाली विकसित करणे इ.
राज्याच्या भूजल संपत्तीचे संरक्षण व संवर्धन होण्याकरिता हा प्रकल्प कार्यरत आहे