Current Affairs
राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक प्रो.सुनील कुमार सिंग यांची जे सी बोस फेलोशिपसाठी निवड
- 28/09/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे (सीएसआयआर-एनआयओ) संचालक प्रो. सुनील कुमार सिंग यांची सायन्स अँड इंजिनिअरिंग बोर्डाच्या महत्वपूर्ण अशा जे सी बोस फेलोशिपसाठी निवड झाली आहे.
प्रो. सुनील कुमार सिंग यांना वैज्ञानिक स्पेशलायझेशनच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल या फेलोशिपसाठी निवड झाली आहे.
प्रो.सिंग यांचे भू-रसायनशास्त्र आणि समस्थानिक रसायनशास्त्र, पॅलेओक्लायमेट आणि पॅले ओशनोग्राफी, न्यूट्रिएंट सायकलिंग आणि जैव-रसायनशास्त्र या विषयात प्राविण्य आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे 75 हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले असून त्यांनी 10 पीएचडी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून सध्या 6 विद्यार्थी त्यांच्याकडे मार्गदर्शन घेत आहेत.
जेसी बोस फेलोशिप शास्त्रज्ञांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रदान केली जाते. फेलोशिप वैज्ञानिक-विशिष्ट आणि अतिशय निवडक संशोधनासाठी प्रदान केली जाते.