Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > लष्करी कमांडर्स परिषद | Council of Military Commanders
लष्करी कमांडर्स परिषद | Council of Military Commanders
- 14/10/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
लष्करी कमांडर्स परिषदेला 16 ते 20 ऑक्टोबर 2023 दरम्यान नवी दिल्ली येथे प्रारंभ होणार आहे.
सर्वोच्च स्तरावरील ही परिषद वर्षातून दोनदा होते.
भारतीय लष्करासाठी महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय सुलभ करणे, वैचारिक पातळीवर विचारविनिमय करणे यासाठी हे एक संस्थात्मक व्यासपीठ आहे.
या वर्षी स्वीकारलेल्या नवीन प्रारुपानुसार, आगामी लष्करी कमांडर्स परिषद मिश्र स्वरूपात आयोजित केली जात आहे.
पहिल्या दिवशी लष्करी कमांडर्स आणि इतर वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होतील. उर्वरित चर्चा प्रत्यक्ष स्वरूपात आयोजित केली जाईल.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 18 ऑक्टोबर 2023 रोजी परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
भारतीय सैन्य प्रगतीशील, दूरदृष्टीभिमुख, अनुकूल आणि भविष्यासाठी सज्ज असेल याची खातरजमा लष्करी कमांडर्स परिषद, त्याच्या विस्तृत व्याप्तीसह करते.