Current Affairs
लसूण पिकाचे उत्पादन
- 07/08/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
● वर्ष 2021-22 आणि 2022-23 मध्ये देशात उत्पादित (पहिला आगाऊ अंदाज) लसूण पिकाचा तपशील खालीलप्रमाणे:-
वर्ष उत्पादन (टनांमध्ये)
● 2021-22 3523
● 2022-23 3369
● भारतातील विविध ऋतू आणि कृषी-हवामान विषयक यांना अनुकूल ठरणाऱ्या लसूण पिकाच्या विविध जाती शोधण्यासाठी जनुकीय सुधारणा करण्यासंदर्भात पुणे येथील आयसीएआर-कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय तसेच नाशिक येथील राष्ट्रीय बागायती संशोधन आणि विकास संस्था योजनाबद्ध संशोधन करत आहेत.
● तसेच,पुणे येथील आयसीएआर- अखिल भारतीय कांदा आणि लसूण संशोधन प्रकल्प नेटवर्कच्या (आयसीएआर-एआयएनआरपी ऑन ओ अँड जी)माध्यमातून देशात विविध ठिकाणी स्थान-विशिष्ट स्वीकारविषयक चाचण्या करण्यात येत आहेत.
● आयसीएआर-एआयएनआरपी ऑन ओ अँड जी च्या माध्यमातून देशात सहा ठिकाणी (महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू (उटी)) खरीप हंगामात लागवड करण्यासाठी सुयोग्य जाती निश्चित करण्यासाठी तीन वर्षे क्षेत्र चाचण्या करण्यात आल्या.
● भीमा, पर्पल आणि जी-282 या दोन जातींनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू (उटी) या तीन ठिकाणी 30 ते 40 क्विंटल प्रती हेक्टर इतके उत्पादन देत उत्तम कामगिरी केली.
● मात्र, रबी हंगामातील उत्पादनाच्या तुलनेत खरीप हंगामातील उत्पादन खूप कमी होते.
● कर्नाटकातील लसूण उत्पादक सध्या गदग लोकल या तेथील स्थानिक जातीची लागवड करत आहेत आणि ही जात तेथे चांगले उत्पादन देत आहे.
● त्याशिवाय, जी-389 नामक लसणाची आधुनिक जात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात खरीप आणि रबी या दोन्ही हंगामात लागवडीसाठी अधिक योग्य ठरते आहे.
● केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.