Current Affairs
लोककलेतील सेवेचा सरकारकडून गौरव | Honored by Govt for Service in Folk Art
- 18/09/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
संगीत, नाटक, शास्त्रीय गायन, लोककला आणि नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कलाकारांना संगीत नाटक अमृत पुरस्काराने उपराष्ट्रपती धनखड यांच्या हस्ते 84 कलाकारांना गौरविण्यात आले.
यात महाराष्ट्रातील सात कलावंतांचा समावेश आहे .
ताम्रपत्र ,शाल आणि प्रत्येकी एक लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे .
या पुरस्कारासाठी राज्यातील सर्वाधिक सात कलाकारांची निवड करण्यात आली.
लोककलेसाठी डॉक्टर प्रभाकर भानुदास मांडे, सतारसाठी पंडित शंकर कृष्णाजी अभ्यंकर, कथकसाठी चरण गिरीधर चांद व डॉक्टर पद्मजा शर्मा, संगीतासाठी उस्ताद उस्मान अब्दुल करीम खान, तारपा लोकसंगीतासाठी भिकल्या लडक्या धिंडा आणि तमाशा व लोकनाट्यासाठी डॉक्टर हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर या मान्यवरांचा संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने गौरव करण्यात आले.
विज्ञान भावनात झालेल्या कार्यक्रमाला संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष डॉक्टर संध्या पुरेचा उपस्थित होते.
‘आझादी का अमृत महोत्सवां’तर्गत या 75 वर्षांवरील ज्या 84 कलाकारांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने गौरविण्यात आले त्यात 70 पुरुष आणि 14 महिला कलाकार होत्या.