Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > लोकसाहित्य समितीच्या अध्यक्षपदी शाहीर हेमंत मावळे
लोकसाहित्य समितीच्या अध्यक्षपदी शाहीर हेमंत मावळे
- 19/07/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
- मराठीतील लोक साहित्याचे संशोधन करून लोकसाहित्य प्रकाशित करण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी कार्यरत लोकसाहित्य समितीची पुनर्रचना करण्यात आली.
- शाहीर हेमंत मावळे यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
- मराठीतील समृद्ध लोकसाहित्याचे संशोधन व जतन करण्याबरोबरच लोकसाहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशातून आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी लोकसाहित्य समितीची स्थापना केली होती.
- चिं. ग.कर्वे, सरोजिनी बाबर, डॉ.द.ता. भोसले या मान्यवरांनी यापूर्वी समितीचे अध्यक्षपद भूषविले होते.
- या समितीच्या माध्यमातून काही ग्रंथांची निर्मिती करण्यात आली असून पारंपारिक बोलीतील लोकगीतांचे दस्तावेजीकरण करण्यात आले आहे.
समितीत 9 सदस्यांचा समावेश:
- अध्यक्षांच्या निवडीसह नऊ जणांचा समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
- डॉक्टर संगीता बर्वे, भावार्थ देखणे, प्रणव पाटील, डॉक्टर प्रकाश खांडगे, गणेश चंदनशिवे, मोनिका ठक्कर, शेखर भाकरे आणि मार्तंड कुलकर्णी यांचा समितीमध्ये सहभाग आहे.
- या समितीचा कार्यकाळ तीन वर्षांचा आहे.