Current Affairs
वर्णद्वेषविरोधातील लढ्याचा डर्बन मधील जागरासाठी “आयएनएस त्रिशूल” दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (“INS Trishul” on tour of South Africa for anti-apartheid vigil in Durban)
- 08/06/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
देशाची आघाडीची युद्धनौका ‘आयएनएस त्रिशूल’ तीन दिवसांच्या सद्भावना यात्रेसाठी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन बंदरावर डेरेदाखल झाली आहे.
वंशद्वेषातून महात्मा गांधी यांना दक्षिण आफ्रिकेतील रेल्वे स्टेशनवर उतरविण्यात आल्याच्या घटनेला 130 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आणि भारत – दक्षिण आफ्रिका यांच्यातील संबंधांच्या त्रिदशकापूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिकेतील पीटरमॉर्रिटझबर्ग या स्टेशनवर 7 जून 1893 रोजी मोहनदास करमचंद गांधी यांना गोऱ्या अधिकाऱ्याने उतरवले. या घटनेनंतर गांधींनी वर्णद्वेषाविरोधात लढा ऊभारला तेथूनच त्यांचा महात्मा गांधी होण्याकडे प्रवास सुरू झाला.
व्यापारी दादा अब्दुल्ला यांचे विधी सल्लागार मोहनदास गांधी 1893 मध्ये डर्बनला गेले. 7 जून 1893 रोजी प्रिटोरियाकडे जाताना प्रथमच ते पीटर मॉरिट्झबर्ग स्टेशनवर उतरले. पहिल्या श्रेणीचे तिकीट काढून गांधी डब्यात बसले मात्र एका युरोपीय प्रवाशाच्या तक्रारीवरून त्यांना गोऱ्या अधिकाऱ्याने डब्याबाहेर काढले. त्या काळी वंशाद्वेषामुळे व कृष्णवर्ण यांना पहिल्या श्रेणीच्या डब्यातून प्रवास करण्याचे परवानगी नव्हती.
त्रिशूलची डर्बन यात्रा ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त’ आयोजित विशेष कार्यक्रमाचा एक भाग आहे
आयएनएस त्रिशूल 9 जून पर्यंत डर्बन मुक्कामी असणार आहे
महात्मा गांधींचा मरणोत्तर सन्मान
पीटरमॉर्रिटझबर्ग येथील स्टेशनवरील घटनेची आठवण म्हणून दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन अध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या हस्ते महात्मा गांधीजींना ‘फ्रीडम ऑफ पीटरमॉर्रिटझबर्ग ‘ या विशेष सन्मानाने मरणोत्तर गौरविण्यात आले.
हा कार्यक्रम 25 एप्रिल 1997 रोजी पार पडला होता . शतकापूर्वीची चूक सुधारण्यासाठी जमलेल्या लोकांसमोर बोलताना मंडेला यांनी दडपशाहीविरोधी लढ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने महात्मा गांधी यांचा वैयक्तिक त्याग आणि समर्पणाच्या भावनेचे स्मरण करावे असे उद्गार काढले होते.