Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > वाईत आढळला ‘क्रिसिला’ जातीचा नवीन कोळी /
वाईत आढळला ‘क्रिसिला’ जातीचा नवीन कोळी /
- 09/08/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
● वाईच्या किसन वीर महाविद्यालय परिसरामध्ये क्रिसीला हा दुर्मिळ जातीचा विविधरंगी कोळी आढळला आहे.
● क्रिसीला हा सॅलटीडेसीडे कुटुंबातील उडी मारणाऱ्या कोळ्यांच्या प्रजातीमधला एक आहे.
● किसन वीर महाविद्यालय परिसर हा पाचगणीच्या पायथ्याला सोमजाई डोंगराच्या पायथ्याशी खोलगट ओढ्याच्या काठी वसलेला आहे.
● या परिसरात अत्यंत दुर्मिळ झाडे, गवत, वेली आहेत.
● विद्यार्थ्यांना शिक्षणात आवड निर्माण होण्यासाठी व संशोधनासाठी प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र व जीवशास्त्र विभागासाठी ही प्रयोगशाळा विकसित केली आहे.
क्रिसीला या भागात अधिक प्रमाणात आढळतो:
● हा कोळी गवत, छोटी झाडे ,जमीन ,झाडाची साल, पाने, फळे या जागी आढळतो.
● झाडावरील छोटे उपद्रवी कीटक यांचे खाद्य असते.
● निसर्गाचा समतोल राखण्यासाठी हे कीटक खूप मदत करतात .अशाच ठिकाणी हा बहुरंगी क्रिसीला कोळी आढळला आहे.
‘क्रिसीला’ चा आकार आणि रंग:
● जगामध्ये सर्वत्र अनेक प्रकारचे प्राणी आढळतात काही रंगीबेरंगी असतात तर काही पूर्णपणे रंगहीन असतात.
● काही खूप मोठे असतात तर काही आकाराने लहान असतात ते डोळ्यांना काही नीट दिसत नाहीत . अशा वेगळ्या जातीतील हा बहुरंगी कोळी आहे.
● या क्रिसीला जातीच्या कोळीचे प्रथम वर्णन 1887 मध्ये डॉक्टर थोरेल यांनी केले होते.
● या प्रजातीमधील मादी दोन ते चार मिलिमीटर आणि नर चार ते नऊ मिलिमीटर लांब असतो.
● त्यांच्या अंगावर लाल हिरवे नारंगी रंगाचे दोन इंद्रधनुषी निळेपट्टेअसतात .
● या कीटकास 8 पाय असून ते पिवळ्या रंगाचे असतात .
● जगामध्ये आतापर्यंत 51,293 प्रकारचे कोळी सापडले आहेत यामध्ये 674 वर्ग आणि 132 कुटुंब त्यापैकीच हा दुर्मिळ क्रिसिला कोळी आहे.