Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > विद्यापीठांचे कुलपतीपद मुख्यमंत्र्यांकडे (Chancellorship of Universities to Chief Minister)
विद्यापीठांचे कुलपतीपद मुख्यमंत्र्यांकडे (Chancellorship of Universities to Chief Minister)
- 22/06/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
( पंजाब विधानसभेत दुरुस्ती विधेयक मंजूर)
- राज्य सरकार मार्फत संचलित होणाऱ्या विद्यापीठांचे प्रमुखपद म्हणजेच कुलपती पद राज्यपाल ऐवजी मुख्यमंत्र्यांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे.
- पंजाब विधानसभेत विधेयक मंजूर करण्यात आले.
- राज्य सरकारने काही विद्यापीठांच्या कुलगुरू पदासाठी सुचविलेल्या नावावरून सरकार व राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यात मतभेद झाले होते.
- या पार्श्वभूमीवर पंजाब सरकार तर्फे पंजाब विद्यापीठ कायदा दुरुस्ती विधेयक 2023 विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले.
- यावर अल्प प्रमाणात चर्चा होऊन ते मंजूर करण्यात आले आहे.