तुर्कस्तानातील अंताल्या या ठिकाणी झालेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या ज्योती सुरेखा आणि पदार्पण करणारा तिचा सहकारी ओजस देवताळे यांनी तैपईच्या खेळाडूंचे आव्हान 159 – 154 असे मोडून काढले आणि विश्वचषक स्टेज एक स्पर्धेत मिश्र दुहेरी कंपाउंड गटात सुवर्णपदक मिळवले
मिश्र दुहेरी कंपाउंड प्रकारात भारताचे हे विश्वचषक स्पर्धेतील दुसरे सुवर्ण यश आहे
ज्योती आणि अभिषेक वर्मा या जोडीने 2022 मध्ये झालेल्या स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते