ऊर्जा मूल्य शृंखलेमधील निवडक क्षेत्रामध्ये तांत्रिक सहकार्य सुरु ठेवण्यासाठी ,वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर), नवी दिल्ली आणि ऑइल इंडिया लिमिटेड ( ओआयएल), नवरत्न एनओसी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
कराराचाउद्देश :
परस्परांची निश्चित भूमिका ठरवणारा सामंजस्य करार ओआयएल आणि सीएसआयआर प्रयोगशाळा यांच्यातील सहकार्यासाठी एक औपचारिक आराखडा तयार करतो. ऊर्जा सुरक्षेसाठी प्रगत तंत्रज्ञानामध्ये संशोधन सुरु ठेवण्यासाठी सहकार्य उपलब्ध करणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.