Current Affairs
व्यापाराला चालना देण्यासाठी भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये द्विपक्षीय करार | Bilateral agreement between India and United Arab Emirates to promote trade
- 17/07/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
भारत आणि संयुक्त अरब अमिरातीने(यूएई) व्यापारी व्यवहार स्थानिक चलनात करण्याचे ठरवले आहे .
याशिवाय भारताची युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) आणि ‘यूएई’ची ‘इन्स्टंट’ पेमेंट प्लॅटफॉर्म (आयपीपी) या यंत्रणा एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन्ही देशांच्या मध्यवर्ती बँकांमध्ये करार करण्यात आले .
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख महंमद बीन झायेद अल नहयान यांच्यात चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशांमध्ये याबाबतचा करार करण्यात आला
स्थानिक चलनाच्या वापरामुळे व्यवहारांची किंमत आणि व्यवहारपूर्तीचा वेळ प्रभावीपणे वापरला जाईल. याशिवाय संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणाऱ्या भारतीयांना मायदेशी पैसे पाठवणे ही सोपे जाणार आहे.
रुपयाचे आंतरराष्ट्रीयकरण:-
भारत आणि संयुक्त अरब अमीराती यांच्यातील व्यापार 85 अब्ज डॉलरचा असून, प्रामुख्याने अमेरिके डॉलर मध्ये होतो.
डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या दरामध्ये बदल झाला तर त्याचा परिणाम भारतीय व्यापारावर होत असतो. या पार्श्वभूमीवर हा करार झाला आहे.
याशिवाय भारतीय रुपयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे प्रयत्न भारताकडून होत आहेत.
याआधी रशियाबरोबरच आफ्रिकेतील देश, आखाती देश, श्रीलंका, बांगलादेश या देशांनी भारताबरोबर रुपयांमध्ये व्यापार करण्याची तयारी दर्शवली आहे.
मध्यवर्ती बँकांमध्ये करार:-
रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ यूएई यांनी दोन करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत .
दुसरा करार हा पेमेंट आणि ‘मेसेजिंग यंत्रणा जोडण्याबाबत करण्यात आला आहे.
रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत आणि यूएई सेंट्रल बँकेचे गव्हर्नर खालेद मोहम्मद बलमा यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
चलन व्यवहार यंत्रणा:
भारत-यूएई येथील व्यापार व्यवहारांसाठी भारतीय रुपया आणि यूएई दिऱ्हम या चलनांचा वापर करता यावा म्हणून एक रचना तयार करण्याबाबत दोन्ही देशात सामंजस्य करार करण्यात आला.
द्वीपक्षीय व्यापारास प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक चलन व्यवहार यंत्रणा विकसित करणे, हा त्यामागील उद्देश आहे.
अबुधाबीत आयआयटी दिल्लीच्या कॅम्पसची उभारणी
अबुधाबी येथे आयआयटी दिल्लीच्या कॅम्पसची उभारणी करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
या कॅम्पसमध्ये जानेवारीपासून पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांना सुरुवात होण्याची शक्यता आहे तर सप्टेंबर पासून पदवी स्तरावरील अभ्यासक्रम सुरू होतील.