Current Affairs
शक्तीकांत दास यांना ‘गव्हर्नर ऑफ द इयर’ पुरस्कार
- 15/06/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
लंडनमध्ये झालेल्या ‘सेंट्रल बँकिंग पुरस्कार 2023’ कार्यक्रमांमध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .
आव्हानात्मक काळात केलेली कामगिरी, कोविड साथीच्या काळात घेतलेले निर्णय आणि महागाईचे कार्यक्षम व्यवस्थापन यासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
‘गव्हर्नर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित होणारे शक्तीकांत हे दुसरे गव्हर्नर आहेत.
यापूर्वी 2015 मध्ये रघुराम राजन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते .
दास यांच्या नेतृत्वाखाली रिझर्व बँकेने अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणले असून अनेक प्रभावी उपाययोजना केले आहेत. त्यांच्या कार्यकाळात युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा (यूपीआय) झपाट्याने विस्तार झाला.
शक्तीकांत दास:-
जन्म:- 26 फेब्रुवारी 1957, भुवनेश्वर, ओडिशा
शक्तीकांत दास यांनी दिल्लीतील स्टीफन्स कॉलेजमधून पदव्युत्तर पदवी घेतली असून 1980 च्या तुकडीतील ते आयएएस अधिकारी आहेत .
मे 2017 पर्यंत ते आर्थिक व्यवहार सचिव होते.
दास यांनी 15 व्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणूनही काम केले असून ब्रिक्स, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि सार्क मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
ऊर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर 12 डिसेंबर 2018 रोजी रिझर्व बँकेचे 25 वे .गव्हर्नर म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला