Current Affairs
शिक्षणतज्ञ डॉ. राम ताकवले यांचे निधन
- 15/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
आधुनिक शिक्षणाचा पाया रचणारे प्रख्यात शिक्षणतज्ञ डॉक्टर राम ताकवले यांचे वयाचे 90 व्या वर्षी निधन झाले.
अल्पपरिचय:
जन्म : 11 एप्रिल 1933 पुरंदर तालुक्यातील हुरगुडे गावात झाला.
त्यांचे काही शालेय शिक्षण ग्रामीण भागात झाले.
पुढे उच्च शिक्षणासाठी त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला.
1956 मध्ये विज्ञान शाखेची पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवली.
मॉस्को विद्यापीठातून त्यांनी पीएचडी संपादन केली.
पुणे विद्यापीठातील अध्यापनानंतर त्यांनी 1988 – 89 या काळात विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी सांभाळली.
डॉक्टर राम ताकवले यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी सांभाळली होती.
महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या स्थापनेत त्यांचे मोठे योगदान होते.
माहिती तंत्रज्ञानातून निर्माण झालेली डिजिटल व्हर्चुअल आणि जागतिक ज्ञानमार्गाची निर्मिती त्यांनी केली.
ग्रामीण भागातील युवकांच्या विकासाचा व उन्नतीचा महामार्ग महाराष्ट्र ज्ञान महामंडळाद्वारे समाजाला उपलब्ध करून दिला.
2001 ते 2004 या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र ज्ञानमंडळाचे संचालक म्हणून काम केले .
महाविद्यालयांचे मूल्यमापन करून श्रेणी देणाऱ्या नॅशनल असेसमेंट आणि ऍक्रेडिटेशन कौन्सिलचे (NAAC) अध्यक्षपदी त्यांनी भूषविले होते.