Current Affairs
संयुक्त राष्ट्रांच्या वनविषयक आघाडीची पहिल्यांदाच भारतात बैठक | First meeting of United Nations Forum on Forestry in India
- 26/10/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
केंद्रीय वने पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने डेहराडून येथील वन संशोधन संस्थेत 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान वनांवरील संयुक्त राष्ट्रांच्या मंचाचा भाग म्हणून बैठकीचे आयोजन केले आहे.
यात 40 पेक्षा अधिक देश आणि 20 आंतरराष्ट्रीय संस्थांमधून वैयक्तिक आणि ऑनलाईन पद्धतीने 80 पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी होतील.
संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने 2017 ते 2030 या कालावधीसाठी पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्रांची जंगल विषयक धोरणात्मक योजना स्वीकारली आहे.
सर्व प्रकारच्या जंगलांचे शाश्वत व्यवस्थापन करण्याकरिता ही धोरणात्मक योजना प्रत्येक स्तरावर एक जागतिक आराखडा म्हणून कार्य करते.
यात जंगलाबाहेरील झाडांचा देखील समावेश आहे तसेच जंगलतोड आणि जंगलांचा ऱ्हास यांचा सामना करण्यासाठी देखील मार्गदर्शक आहे.
मध्यप्रदेशचे ‘वणवा नियंत्रण मॉडेल’ देशभरात लागू केले जाणार
मध्य प्रदेशचे ‘ वणवा नियंत्रण मॉडेल’ देशभरात लागू केले जाणार आहे .
या मॉडेलमध्ये वन कर्मचाऱ्यांना मोबाईल मधील ॲपद्वारे आगीची माहिती मिळते.
छत्तीसगड राज्यातही हे मॉडेल लागू करण्यात आले आहे.
या मॉडेलचा वापर करून जंगलातील आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यात आले.