Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > सांख्यिकीशास्त्रज्ञ कल्यामपुडी राव यांना आंतरराष्ट्रीय सन्मान
सांख्यिकीशास्त्रज्ञ कल्यामपुडी राव यांना आंतरराष्ट्रीय सन्मान
- 11/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
-
- भारतीय अमेरिकी सांख्यिकीशास्त्रज्ञ कल्यामपुडी राधाकृष्ण राव यांना सांख्यिकीमधील इंटरनॅशनल प्राइज इन स्टॅटिस्टिक हा प्रतिष्ठेचा सन्मान जाहीर केला आहे.
- हा पुरस्कार नोबेल सन्मानाच्या समक्ष मानला जातो.
- अभ्यासातून आणि संशोधन कार्यातून सांख्यिकी शास्त्रात 75 वर्षांपूर्वी क्रांतिकारी बदल घडवून आणल्याच्या सन्मानार्थ सी. आर. राव यांना गौरविण्यात येत आहे.
- जुलै महिन्यात कॅनडातील ओटावा येथे जागतिक सांख्यिकी परिषदेत त्यांना गौरविण्यात येणार असून पुरस्काराचे स्वरूप 80 हजार अमेरिकी डॉलर एवढे आहे.
कल्यामपुडी यांचा अल्पपरिचय
-
- जन्म : 10 सप्टेंबर 1920, हदगली, मद्रास
- अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनने त्यांचे वर्णन एक जिवंत आख्यायिका म्हणून केले आहे.
- राव यांनी प्रथम इंडियन स्टेटस आणि केंब्रिज मधील मानववंशशास्त्रीय राष्ट्रीय संग्रहालयात काम केले नंतर त्यांनी भारतीय सांख्यिकी संस्थेचे संचालक, पिट्सबर्ग विद्यापीठात प्राध्यापक, पेनिसिलव्हिया राज्याच्या बहुविविध विश्लेषण केंद्राचे संचालक म्हणून काम केले.
- राव हे इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिकल मॅथेमॅटिक्स (अमेरिका) आणि इंटरनॅशनल बायोमेट्रिक सोसायटीचे अध्यक्ष होते.
- औद्योगिक आकडेवारी आणि उद्योगांमध्ये गुणवत्ता नियंत्रण कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या राष्ट्रीय गुणवत्ता आणि विश्वसनीयता संस्थेच्या (चेन्नई शाखा) ‘हॉल ऑफ फेम’ मध्ये समावेश करण्यात आला
राव यांना मिळालेले पुरस्कार
-
- पद्मभूषण (1968)
- पद्मविभूषण (2001)
- Wilks मेमोरियल अवॉर्ड (1989)
- रामानुजन मेडल (2003)
- सरदार पटेल लाईफ टाईम आचिवमेंट अवॉर्ड (2014)
इंटरनॅशनल प्राईज इन स्टॅटिस्टिक्स
विज्ञान-तंत्रज्ञान आणि मानव कल्याण प्रगती करण्यासाठी आकडेवारीचा वापर मोठी कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला 2016 या वर्षापासून दर दोन वर्षाला ‘इंटरनॅशनल प्राइज इन स्टॅटिस्टिक्स‘ ने सन्मानित करण्यात येते.