Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > सात्विक – चिरागला कोरिया ओपन सुपर 500 स्पर्धेचे विजेतेपद
सात्विक – चिरागला कोरिया ओपन सुपर 500 स्पर्धेचे विजेतेपद
- 24/07/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
- बॅडमिंटन विश्वातील आपला दबदबा कायम राखताना भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी(आमलापुर,आंध्र प्रदेश) आणि चिराग शेट्टी(मुंबई, महाराष्ट्र) जोडीने यावर्षी हंगामातील चौथे विजेतेपद मिळवले.
- सात्विक- चिराग जोडीने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या फजर अलफियान आणि महम्मद रियान ऑड्रियांतो या इंडोनेशिया जोडीचा 17- 21, 21-13, 21 -14 असा पराभव करीत कोरिया ओपन स्पर्धा सुपर 500 जिंकली.
- या जोडीने यावर्षी कामगिरीत कमालीचे सातत्य राखले यावर्षीच्या हंगामात त्यांनी सलग 10 सामने जिंकण्याची कामगिरी करून दाखवली.
2023 मधील सात्विक-चिरागची विजेतेपदे:
1) स्विस ओपन सुपर 300
2)आशियाई अजिंक्यपद स्पर्धा
3)इंडोनेशिया ओपन सुपर 1000
4) कोरिया ओपन सुपर 500
- 2023 कोरिया ओपन ही बॅडमिंटन स्पर्धा एकूण 30 वी स्पर्धा होती.
- 18 ते 23 जुलै 2023 या कालावधीत दक्षिण कोरियाच्या येओसू येथील जिन्नम स्टेडियमवर ही स्पर्धा खेळविण्यात आली होती.