Current Affairs
सिंगापूरच्या दोन उपग्रहांचे इस्रोच्या पीएसएलव्हीद्वारे प्रक्षेपण
- 23/04/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने पीएसएलव्हीसी-सी 55 या प्रक्षेपकाद्वारे सिंगापूरच्या दोन उपग्रहांचे 22 एप्रिल 2023 रोजी नियोजित कक्षेत श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून यशस्वीरित्या प्रेक्षपण केले
इस्रो ने अवकाशात सोडलेल्या परदेशी उपग्रहांची संख्या आता 424 इतकी झाली आहे
पीएसएलव्ही ची ही 57 वी मोहीम होती
दोन उपग्रहांची नावे:
1) टेलिओस – 2
2)ल्युमलाईट – 4
इस्रोची व्यावसायिक शाखा ‘न्यू स्पेस इंडिया’ लिमिटेड द्वारे सिंगापूरच्या या दोन उपग्रहांच्या प्रक्षेपणाची जबाबदारी घेण्यात आली होती
1)टेलिओस-2 :-
सिंगापूर सरकारची ‘संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था’ आणि ‘एसटी इंजीनियरिंग’ यांनी भागीदारीत ‘टेलिओस – 2’ ची निर्मिती केली आहे .
सिंगापूरच्या सरकारच्या विविध यंत्रणांना आवश्यक असलेल्या उपग्रह प्रतिमा पुरविण्याचे काम ‘टेलीओस-2’ चे आहे . सर्व ऋतूंमध्ये दिवस रात्र कार्य करण्याचे क्षमता या उपग्रहात आहे
2)ल्युमलाईट – 4 :-
नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरच्या ‘इन्स्टिट्यूट फॉर इन्फोकॉम रिसर्च’ आणि ‘सॅटॅलाइट टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर’ ने ‘ल्युमलाईट- 4’ हा उपग्रह विकसित केला आहे.
ई- नेविगेशन सागरी सुरक्षा वाढवणे, जागतिक शिपिंग समुदायाला मदत करणे हा या उपग्रहाचा उद्देश आहे.