Current Affairs
सीबीआयच्या संचालकपदी प्रवीण सुद यांची निवड
- 15/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेषण विभागाचे पुढील संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्यमान संचालक सुबोध जयस्वाल हे 25 मे रोजी निवृत्त होत असून 59 वर्षांचे प्रवीण सुद हे त्यांची जागा घेतील.
पदभार स्वीकारण्यापासूनच्या तारखेपासून दोन वर्षांसाठी त्यांची नियुक्ती असेल.
प्रवीण सूद :
सूद हे कर्नाटक कॅडरचे भारतीय पोलीस सेवेचे 1986 च्या तुकडीचे अधिकारी तसेच जयस्वाल यांच्यानंतर देशातील सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ,सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधिरंजन चौधरी यांचा समावेश असलेल्या उच्च अधिकार समितीने प्रवीण सुद यांच्या नावाला मंजुरी दिली.
प्रवीण सुद यांची शैक्षणिक पार्श्वभूमी छाप पाडणारी आहे. ते आयआयटी दिल्ली, आयआयएम बेंगळुरू आणि न्यूयॉर्कच्या सिराक्यूज विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत.
मॉरिशस सरकारचे पोलीस सल्लागार म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
वाहतूक व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्णरित्या वापर केल्याबद्दल त्यांना नॅशनल ई- गव्हर्नन्स गोल्ड अवार्ड ने 2011 या वर्षी सन्मानित करण्यात आले होते.
CBI : (Central Bureau Investigation)
केंद्रीय अन्वेषण ब्युरो ही भारताची प्रमुख तपास संस्था आहे.
स्थापना : 1 एप्रिल 1963
मुख्यालय : नवी दिल्ली
मोटो : उद्यमिता, निष्पक्षता, सत्यनिष्ठा (Industry, Impartiality, Integrity)