Current Affairs
‘सेल्फी विथ डॉटर’ मोहिम
- 02/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शंभराव्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात सेल्फी विथ डॉटर काढण्याच्या मोहिमेचे कौतुक केले.
हरियाणात 2015 मध्ये स्त्रीभ्रूणहत्ये विरुद्ध जनजागृती निर्माण करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील जगलान यांनी ही अनोखी मोहीम सुरू केली होती.
जगलान हरियाणातील बिबीपुरचे माजी सरपंच आहेत.
‘ सेल्फी विथ डॉटर’ या मोहिमेचे जनक म्हणूनही सुनील जगलान यांना ओळखले जाते.
काय आहे ही मोहीम?
‘सेल्फी विथ डॉटर’ या मोहिमेत जगलान यांनी आपल्या मुलीसह सेल्फी काढून सोशल मीडियावर अपलोड करण्याचे आवाहन केले होते.
त्यानंतर जगलान यांनी मुलींबरोबरची सेल्फी शेअर करण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळाचीही निर्मिती केली होती.
या मोहिमेमुळे लोकांची मानसिकता बदलून हरियाणातील लिंग गुणोत्तर सुधारण्यास मदत झाली.
जगलान यांना नंदिनी आणि याचिका नावाच्या दोन मुली असून त्यांनी घराबाहेर मोठी मुलगी नंदिनीच्या नावाची पाटीही लावली आहे.