Current Affairs
The Officer - Your Personal Mentor > Current Affairs > information > स्वच्छ मुख अभियानाचे सदिच्छा दूत म्हणून सचिन तेंडुलकर यांची निवड
स्वच्छ मुख अभियानाचे सदिच्छा दूत म्हणून सचिन तेंडुलकर यांची निवड
- 31/05/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
No Comments
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत स्वच्छ मुख अभियानासाठी SMILE AMBASSADOR म्हणून भारतरत्न श्री.सचिन तेंडुलकरची यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्वच्छ मुख अभियान हे एक ओरल हेल्थ मिशन आहे. वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत हा उपक्रम पुढील 5 वर्षांसाठी राबवण्यात येणार आहे.
स्वच्छ मुख अभियान म्हणजेच SMA ही ओरल हेल्थ आणि मुख स्वच्छतेच्या महत्त्वाबद्दल भारतीयांना शिक्षित करण्यासाठीची भारतीय डेंटल संघटनेनं (IDA) राबवलेली एक राष्ट्रीय मोहीम आहे. ही मोहीम केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात राबवण्यात येणार आहे.