बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हमुन चक्रीवादळ बांगलादेशच्या दक्षिण पूर्व किनाऱ्याला धडकले .
चितगाव ते कॉक्स बाजार दरम्यान प्रति तास 104 किलोमीटर वेगाने चक्रीवादळाने बांगलादेशचा किनारा ओलांडला.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या उष्णकटिबंधीय चक्रीवादळाला इराणने हमून हे नाव दिले असून, ‘हमून’ हा शब्द पर्शियन शब्द आहे. जो अंतर्देशीय वाळवंट तलाव किंवा दलदलीच्या प्रदेशांना सूचित करतो.