Current Affairs
हवाई दलाच्या ताब्यात एलसीए तेजस चा समावेश | Induction of LCA Tejas in Air Force custody
- 05/10/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
हिंदुस्तान एअरनॉटिक्स लिमिटेडने पहिले एलसीए तेजस हे दोन आसनी विमान भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केले.
या विमानाचा प्रशिक्षणासाठी वापर केला जाऊ शकतो तसेच आवश्यकता भासल्यास प्रत्यक्ष आघाडीवर देखील त्यांना तैनात केले जाऊ शकते.
कंपनीच्या बेंगळुरू येथील एलसीए म्हणजेच ‘लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ तेजस हे विमान वजनाने हलके आहे .
बहूउपयुक्त असलेले हे विमान 4.5 श्रेणीतील असून कोणत्याही हवामानात ते प्रभावी ठरू शकते.
अद्ययाव संकल्पना आणि तंत्रज्ञानाचे मिश्रण म्हणजे हे विमान आहे.
या विमानामुळे भारत उच्च क्षमता असलेल्या देशांच्या यादीत सामील झाला असून भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारतीय उपक्रमाला बळ मिळाले आहे.
‘ एलसीए’ तेजस हवाई दलाकडे सुपूर्द करताना संरक्षण राज्यमंत्री अजय भट हवाई दलाचे एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सी.बी. आनंदकृष्णन उपस्थित होते.