Current Affairs
हवामान बदलांच्या समस्यांचा मुकाबला करण्यासाठी ‘महाराष्ट्र ग्रीन फायनान्स वर्किंग कमिटीची’ स्थापना
- 14/07/2023
- Posted by: Om Kharat
- Category: information
हवामान बदलांच्या समस्यांचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार हरित रोखेंच्या माध्यमातून 5,000 कोटी रुपये उभारणार आहे.
त्यासाठी वित्त विभागाचे अप्पर सचिव डॉक्टर नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र ग्रीन फायनान्स वर्किंग कमिटी स्थापन करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने हवामान बदलांच्या समस्यांचा मुकाबला करण्यासाठी 16000 कोटी रुपये उभे करण्याचे ठरविले आहे .
त्यानुसार राज्य सरकारही हरित रोख्यांच्या माध्यमातून 5000 कोटी रुपये उभारणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023- 24 च्या अर्थसंकल्पात केली आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.
हरित रोख्यांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून नवीनकरणीय ऊर्जा ,हरित इमारती, हरित हायड्रोजन, इलेक्ट्रिक मोबॅलिटी व चार्जिंग सुविधा इत्यादी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत .
त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी ही समिती गठित करण्यात आली असून त्यात नियोजन, वित्त, ऊर्जा, पर्यावरण परिवहन, महसूल व वने या विभागांचे प्रधान सचिव,अप्पर मुख्य सचिवांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.